Pipeline Burst : हडपसर ते कुंजीरवाडीदरम्यान फुटली पाईपलाईन; रस्त्याला ओढ्याचे स्वरूप

एमपीसी न्यूज : हडपसर ते कुंजीरवाडी (Pipeline Burst) दरम्यान पाईपलाईन फुटल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे सोलापूर- पुणे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. 

या घटनेमुळे सोलापूर- पुणे मार्गावरील वाहतूकही पुणे सोलापूर लेनमध्ये वळवल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. पुणे सोलापूर मार्गावर गाड्यांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

Murlidhar Mohol : आपल्यातील एक सहकारी त्याच्या कर्तुत्वावर मोठा झाला – चंद्रकांत पाटील

सखल भाग असल्याने पाणी रस्त्यावर साठून राहिले आहे. दुरुस्तीचे (Pipeline Burst) काम युद्धपातळीवर सुरू असून एक तासाभरात वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.