Bhaskar Jadhav : नारायण राणेंविरोधात केलेले विधान भास्कर जाधव यांना पडणार भारी? पुण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भास्कर जाधव संकटात सापडल्याचे पाहायला (Bhaskar Jadhav) मिळत आहे. या प्रकरणी आता जागोजागी राणे समर्थक-कार्यकर्ते आक्रमक झाले असून मुंबई नंतर आता पुण्यातही त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत.

शिवसेना उद्धव गटातील नेते भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल अवमानकारक भाषा वापरल्याबद्दल तसेच समाजात वादात्मक भाषण करून सामाजिक भावना दुखावल्याबद्दल पुणे शहर डेक्कन पोलीस ठाण्यात आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुडाळ, मुंबई नंतर आता पुण्यात देखील याचे पडसाद दिसून येत आहेत.

Pipeline Burst : हडपसर ते कुंजीरवाडीदरम्यान फुटली पाईपलाईन; रस्त्याला ओढ्याचे स्वरूप

एवढेच नव्हे तर मुंबईमध्ये “आपण यांना पाहिलंत का?” असे भास्कर (Bhaskar Jadhav) जाधव यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यांना शोधून आणणाऱ्याना 11 रुपये पारितोषिक अशा प्रकारचे बॅनर भाजप कार्यकर्त्यानी लावले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.