Murlidhar Mohol : आपल्यातील एक सहकारी त्याच्या कर्तुत्वावर मोठा झाला – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – आपल्यातील एक ( Murlidhar Mohol) सहकारी त्याच्या कर्तुत्वावर मोठा झाला. तो आनंद व्यक्त आणि विश्वास देणारा कार्यक्रम आहे, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुरलीधर मोहोळ यांचे गुणगान केले.

पाटील यांच्या हस्ते मोहोळ यांची सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, प्रभारी धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप पार्टी विथ डिफरनस पक्षात संघटनात्मक निवडणुका झाल्या नाहीत, पण, पक्षात लोकशाही पद्धतीने काम होते. त्यामुळे निवडणुका नाही, खेचाखेची नाही अशी आदर्श पार्टी आहे. मेहनतीने पक्षाची संस्कृती विकसित झाली. हिंदू विचारावर पक्ष चालवतो, ज्यात दुसऱ्याला मोठे केले जाते, त्यात आनंद वाटतो.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना व कर्मचाऱ्यांना फराळ वाटप

जगदीश मुळीक म्हणाले, शहर म्हणून एकत्र ( Murlidhar Mohol) काम केले. आम्ही सर्व एकत्र आहोत, आम्ही वेगळ्या भावनेने काम करतो. व्यक्ती केंद्रित काम करत नाही. पार्टी म्हणून राष्ट्रासाठी काम करतो. पारदर्शक सरकार म्हणून मोदी सरकारची ओळख आहे. त्यामुळे आपण प्रगती पथावर आहोत. पुणे महापालिकेत भाजपने चांगले काम केले.

अडीच वर्षात महाविकास पुण्यासाठी काही केले नाही. पाच वर्षात पुण्यात खूप काम केले. पन्नास वर्षात काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने कोणतेच नियोजन केले नाही. त्यांनी भाजपवर टीका करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. मुरलीधर मोहोळ म्हणाले, भावनेने जोडलेला हा विषय आहे. घरच्यांचे प्रेम व्यक्त केले आहे. कुटुंबाच्या वतीने सत्कार होत आहे. नेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. हा कार्यकर्ता काम करू शकतो असा विश्वास असावा. त्या जबाबदारीला कामातून न्याय देऊन मी पश्चिम महाराष्ट्राचा प्रवास केला. चार वर्षांत संघटना बळकट झाली आहे. या सत्कारामुळे ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळणार आहे, याचे मोल मोठे आहे.

पक्षाने मला संघटना आणि लोकप्रतिनिधी म्हणून खूप काही दिले आहे. त्यासाठी मी कृतज्ञ आहे. कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनीत जोशी यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमाचे निमंत्रक माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी प्रास्ताविक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.