-MPC-TOP-MOST-BANNER-I

Delhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार

PM Narendra Modi to address nation tonight at 8pm on the coronavirus pandemic लॉकडाउन वाढणार की सूट मिळणार याबाबत उत्सुक्ता

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आज देशाला संबोधित करणार आहेत. रात्री 8 वाजता मोदी देशाला संबोधित करणार आहेत. यामुळे लॉकडाउन वाढणार की सूट मिळणार याबाबत सर्वांना उत्सुक्ता लागली आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात 24 मार्च 2020 पासून लॉकडाउन आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरु आहे. हा टप्पा 17 मे रोजी संपणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी (दि.11) देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यांच्याशी चर्चा केली.

त्यामध्ये काही मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन वाढविण्याच्या बाजुने भुमिका घेतली आहे. तसेच चौथ्या लॉकडाउनमध्ये काही अटील शिथील करण्याची मागणी केली आहे.

त्यापार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे लॉकडाउन वाढणार की सूट मिळणार याबाबत सर्वांना उत्सुक्ता लागली आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn