Chakan : पीएमपी बस चालकाला बेदम मारहाण; रिक्षा चालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बस पार्किंगच्या कारणावरून रिक्षा चालकाने पीएमपी बस चालकाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 2) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आंबेठाण चौक चाकण (Chakan) येथे घडली.

Chakan : गोडाऊन मधून 80 हजारांचा भंगार माल चोरीला

मोहन अर्जुन माळेकर (वय 54, रा. दिघी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पीएमपी बस चालक आहेत. पिंपरी ते चाकण या मार्गावर ते नेमणुकीस आहेत. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांनी आंबेठाण चौक चाकण येथील रिक्षा स्टॅन्डवर बस थांबवली.

त्या कारणावरून रिक्षा चालकाने त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये फिर्यादी जखमी झाले आहेत. तर पोलिसांनी रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.