Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयाच्या बीबीए आणि बीबीए(सीए) परीक्षेचा निकाल 89 टक्के

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बीबीए आणि बीबीए(सीए) परीक्षेत तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील इंद्रायणी महाविद्यालयाचा निकाल 89 टक्के लागला आहे. शुक्रवारी (दि. 28) ऑनलाइन पद्धतीने हे निकाल जाहीर करण्यात आले.

Chakan : पीएमपी बस चालकाला बेदम मारहाण; रिक्षा चालकावर गुन्हा दाखल

इंद्रायणी महाविद्यालयाच्या वैष्णवी संतोष भेगडे हिने बीबीएत 81.60 टक्के तर बीबीए(सीए)त अनुजा केशव येडके हिने 82.79 टक्के गुण प्राप्त करत महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे  आणि नियामक मंडळाच्या सदस्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे यंदाही परीक्षेतील टक्केवारीत ग्रामीण भागातील मुलींचे वर्चस्व कायम राहिले असल्याचे परीक्षा विभागप्रमुख विद्या भेगडे यांनी सांगितले.

बीबीएत प्रथम तीन क्रमांक पटकावलेले विद्यार्थी:

१)  वैष्णवी संतोष भेगडे (८१.६०)

२)  कनवटे अंकिता कृष्णा (८०.२०)

३) श्वेता संतोष आगळे (७८.५२)

बीबीए(सीए)त प्रथम तीन क्रमांक पटकावलेले विद्यार्थी:

१) अनुजा केशव येडके (८२.७९)

२) साक्षी बाळासाहेब कुरकुटे (७९.७७)

३) दर्शन प्रकाश ठाकरे (७७.५८%)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.