PMPML News : ‘पीएमपी’च्या निगडी-आदर्शनगर मार्गाचा दत्तनगरपर्यंत विस्तार 

 एमपीसीन्यूज :  पीएमपीएमएलच्या वतीने निगडी-आदर्शनगर बसचा आता सेंट जोसेफ स्कूल म्हणजेच  दत्तनगर पर्यंत  विस्तार करण्यात आला  आह.  त्यामुळे  दत्तनगर श्रीनगर आणि बापदेवनगरमधील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 

निगडी – आदर्शनगर बस सुरु झाल्यानंतर  आदर्शनगर आणि परिसरातील नागरिकांची प्रवासासाठी होणारी गैरसोय दूर झाली होती. मात्र, सेंट जोसेफ स्कूल, दत्तनगर, श्रीनगर आणि बापदेव नगर येथील असंख्य प्रवाशांना बस प्रवासाठी आदर्श नगर किंवा विकासनगर येथे जावे लागत होते. त्यामध्ये पायपीट होत होती. तसेच वेळेचा अपव्यय व्हायचा.

_MPC_DIR_MPU_II

या पार्श्वभूमीवर  स्थानिक नगरसेविका प्रज्ञा खानोलकर आणि  माजी नगरसेवक मनोज  खानोलकर यांनी प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी ‘पीएमपी’ प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु केला.

नगरसेविका खानोलकर यांनी पीएमपीच्या स्वारगेट येथील वाहतूक व्यवस्थापकांकडे निवेदन पाठवून  निगडी – आदर्शनगर बस  सेंट जोसेफ स्कूल, दत्तनगरपर्यंत नेण्याची  मागणी केली होती. अखेर ही मागणी मान्य करीत उद्यापासून म्हणजेच शुक्रवार, दि. 25 डिसेम्बरपासून या बस सेवेचा दत्तनगरपर्यंत विस्तार करण्यात येत असल्याचे खानोलकर यांनी सांगितले.

दरम्यान, नगरसेविका   प्रज्ञा  खानोलकर यांच्या वाढदिवसा निमित्त  उद्या शुक्रवारी सकाळी 10 वाजता या बस सेवेचे  उदघाटन करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.