PMPML : महाशिवरात्री निमित्त पीएमपीएमएलकडून महत्त्वाच्या बसस्थानकांवरून बसेसचे नियोजन

एमपीसी न्यूज : महाशिवरात्री निमित्त (PMPML) भाविकांच्या सोयीसाठी शनिवार 18 फेब्रुवारी रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून महत्वाच्या बसस्थानकांवरून बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. शहरातून तसेच उपनगरातून अनुक्रमे निळकंठेश्वर (रूळेगांव), बनेश्वर (नसरापूर), घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुढे नमूद केलेल्या स्थानकाहून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

स्थानकाचे नाव आणि मार्ग – 

  1. कात्रज सर्पोद्यान कात्रज सर्पोद्यान ते बनेश्वर (चेलाडी फाटा पर्यंत)
  2. स्वारगेट मुख्य स्थानक स्वारगेट ते निळकंठेश्वर (रूळेगांव)
  3. निगडी (पवळे चौक) निगडी (पवळे चौक) ते घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी)

तसेच, कात्रज सर्पोद्यान येथून बनेश्वर (चेलाडी फाटा) येथे जाण्याकरिता पहिली फेरी पहाटे साडेपाच वाजता असून यात्रेसाठी 2 जादा क्रु व पर्यायी बसमार्ग क्रमांक 61 – कात्रज ते सारोळा, बसमार्ग क्रमांक 293 – कात्रज सर्पोद्यान ते सासवड मार्गे कापूरहोळ, बसमार्ग क्रमांक 293 – कात्रज सर्पोद्यान ते विंझर व बसमार्ग क्रमांक 296 अ-कात्रज सर्पोद्यान ते वांगणीवाडी या मार्गांवर 11 बसेस सरासरी 20 मिनिटे वारंवारितेने उपलब्ध आहेत.

त्याचबरोबर स्वारगेट मुख्य स्थानकावरून निळकंठेश्वर (PMPML) (रूळेगांव) येथे जाण्याकरीता पहिली फेरी पहाटे साडेतीन वाजता असून यात्रेसाठी 18 जादा क्रु व पर्यायी बसमार्ग क्रमांक 52, अ-स्वारगेट ते पानशेत/वरसगांव या मार्गावर 2 नियमित व जादा क्रु च्या बसेस सरासरी 10 ते 15 मिनिटे वारंवारितेने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

त्याचप्रमाणे निगडी (पवळे चौक) येथून घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) येथे जाण्याकरीता पहिली फेरी पहाटे 5  वाजून 20 मिनिटे असून सदर ठिकाणी जाण्याकरीता पर्यायी बसमार्ग क्रमांक 228 – कात्रज ते वडगाव मावळ, बसमार्ग क्रमांक 305 -निगडी पवळे चौक ते वडगाव मावळ व बसमार्ग क्रमांक 368 -निगडी ते लोणावळा मार्गे कामशेत या तीन मार्गांवर एकूण 22 बसेस सरासरी 10 ते 15 मिनिटे वारंवारितेने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

तरी (PMPML) तीनही बसस्थानकांवरून उपलब्ध करून देण्यात आलेल्या बससेवेचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळामार्फत करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.