Chinchwad Bye-Election: राष्ट्रवादीच्या नेत्यांचा स्थानिक कार्यकर्त्यांवर भरोसा नाय काय?

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीच्या (Chinchwad Bye-Election) वतीने चिंचवड मतदार संघात नाना काटे यांना उमेदवारी दिली खरी, मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांचा स्थानिक नेत्यांवर विश्वास नसल्याचे दिसत आहे. मावळ व पुणे जिल्ह्यातील नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार हे स्थानिक कार्यकर्त्यांना फोन करत आहेत. त्यांचे खासगी सचिव नगरसेवकांच्या घराबाहेर पहाऱ्यासारखे बसून आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा स्थानिक कार्यकर्त्यांवर भरवसा नाय काय? असा सवाल शिवसेनेच्या माजी नगरसेविका मीनल यादव यांनी केला आहे.

यादव म्हणाल्या, महाविकास आघाडीच्या वतीने राहुल कलाटे यांचे नाव चर्चेत होते. त्यांना डावलून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली; मात्र आता राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकल्याचे दिसत आहे.

स्थानिक कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विश्वास नसल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे स्वतः शहरातील नेते व कार्यकर्त्यांना फोन करत आहेत.

PMPML : महाशिवरात्री निमित्त पीएमपीएमएलकडून महत्त्वाच्या बसस्थानकांवरून बसेसचे नियोजन

पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांपेक्षा पुणे जिल्ह्यातील (Chinchwad Bye-Election) व मावळातील नेतेच प्रचारात रिमोट कंट्रोल हाती ठेवून आहेत. स्थानिक नेते व कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भरोसा नाय काय? उमेदवार अजित पवार, सुनिल शेळके आहेत की नाना काटे? असा सवाल मीनल यादव यांनी केला आहे.

स्थानिक कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखविणाऱ्या राष्ट्रवादीला कार्यकर्त्यांनी धडा शिकवावा असे आवाहनही यादव यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.