Pimpri News : पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांचे चिमुकल्यांसोबत रक्षा बंधन 

मोशी-चिखली येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलचा अनोखा राखी-रक्षक उपक्रम

एमपीसी न्यूज : पुण्याचे पोलिस आयुक्त श्री. कृष्णप्रकाश यांना मोशी-चिखली येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलचे विद्यार्थी किर्तना, अंशिका मिश्रा, स्पंदन जाधव, स्वरा पाटील, वृंदा तसेच संचालिका कमला बिष्ट, शिक्षिका दिशा लालानी यांनी रक्षा-सूत्र बांधून औक्षण केले. 

तुम्ही सर्वांनी कोविड महामारीमध्ये आमच्या सुरक्षेची काळजी घेतली. आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुमच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत, आम्ही तुम्हाला रक्षाबंधनाचा संरक्षक धागा बांधत आहोत. आम्ही शाळेचे विद्यार्थी देवाकडे प्रार्थना करतो की, त्याचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतील. असे इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रक्षा सूत्र बांधताना व्यक्त केले. यावर आयुक्त कृष्णप्रकाश भारावून गेले.

करोना महामारीमध्ये समाजातील ज्या बांधवांनी देशाचे रक्षण केले त्या बांधवांचा सन्मान मोशी-चिखली येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या चिमुकल्यांनी केला. पूर्ण देश लॉकडाऊन असताना, समाजात फिरण्याची भीती असतानाही वैद्यकीय बांधव, पोलिस बांधव, सफाई बांधव, विद्युत बांधव, पाणीपुरवठा बांधव, अग्निशामक बांधव, वाहन नियंत्रण पोलिस बांधव आदी बांधव अहोरात्र नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी सदैव तत्पर होते.

समाजातील संस्कृती, रूढी, परंपरा, सण, उत्सव यांची जपणूक इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूल मध्ये राखली जाते. विद्यार्थ्यांना देशातील संस्कृतीची ओळख व्हावी, समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना निर्माण व्हावी याच उद्देशाने राखी-रक्षक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पुणे पोलिस आयुक्तालय मधील अधिकारी व कर्मचारी, चिखली येथील आरटीओ अधिकारी व कर्मचारी, महानगरपालिकेच्या क प्रभागाचे अधिकारी व कर्मचारी, वायसीएम मधील डॉक्टर व वैद्यकीय सेवक, संत तुकाराम नगर येथील अग्निशामक दलातील अधिकारी व कर्मचारी, कुदळवादी पोलिस स्टेशन मधील पोलिस कर्मचारी, चिखली येथील विद्युत विभागाचे कर्मचारी, जाधववाडी येथील महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आदी बांधवांचा चिमुकल्यांच्या हातून राखी बांधून सन्मान करण्यात आला.

चिमुकल्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना रक्षकांचे आशीर्वाद घेतले. या बंधनामुळे अधिकारी आणि कर्मचारी भारावून गेले. विविध क्षेत्रातील रक्षकांनी चिमुकल्यांसोबत फोटो घेतले.

रक्षाबंधन हे असे बंधन आहे जे मन आणि हृदयाला जोडते. तिलक लावल्यामुळे मनाला शीतलता प्राप्त होते, एकाग्रता वाढते, व्यक्तीमध्ये ऊर्जा संक्रमित करतो. औक्षण करीत असताना हलणाऱ्या दिव्याच्या ज्योती संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध होतात. या ज्योती वाईट गोष्टी शोषून घेतात, त्यांचा नायनाट करतात. असे रक्षा बंधनाचे महत्व संचालिका कमला बिष्ट यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

मुली जन्मापासूनच सशक्त आहेत त्यांनी त्यांची शक्ती कमी करू नये असे प्रतिपादन वायसीएमचे डॉक्टर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.