Pradeep Tapkir : प्रदीप तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी रंगणार ‘न्यू होम मिनिस्टर’; दुचाकीसह विविध बक्षीसे

एमपीसी न्यूज – च-होलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रदीप (आबा) तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त 12 ते 20 नोव्हेंबर 2022 दरम्यान कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. (Pradeep Tapkir) त्याअंतर्गत उद्या (शनिवारी) खास महिलांसाठी क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत खेळ रंगला पैठणीचा, न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला आहे. विजेत्या महिलांना दुचाकीपासून ते स्मार्ट फोनपर्यंत विविध आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत.

प्रदीप तापकीर यांचा 20 नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त प्रदीप आबा तापकीर युवा मंच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि समस्त ग्रामस्थ च-होली बुद्रुक यांच्यावतीने परिसरातील नागरिकांसाठी 12 ते 20 नोव्हेंबर 2022 दरम्यान कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. च-होलीतील तनिष अर्चिड समोर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. बालगायिका टीव्हीस्टार सह्याद्री मळेगावकर ही गाणार आहे. क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत खेळ रंगला पैठणीचा, न्यू होम मिनिस्टरचा कार्यक्रम रंगणार आहे.

FDA action : पुणे शहरात प्रतिबंधित पदार्थांसंदर्भात आणखी दोन ठिकाणी कारवाई

प्रथम क्रमांक पठकाविणा-या महिलेला टु-व्हिलर आणि मानाची पैठणी दिली जाणार आहे. द्वितीय क्रमांक येणा-या महिलेला 1 तोळ्याची अंगठी, पैठणी भेट देण्यात येईल.(Pradeep Tapkir) तृतीय क्रमांकाला वॉशिंग मशिन, पैठणी, चौथा क्रमांकाला फ्रीज, पैठणी, पाचवा क्रमांक येणा-या महिलेला वॉटर प्युरीफायर, पैठणी, सहावा क्रमांक येणा-या महिलेला ओव्हन, पैठणी आणि सातवा क्रमांक येणा-या महिलेला स्मार्ट फोन आणि पैठणी भेट दिली जाणार आहे. याशिवाय एक लकी ड्रॉ काढण्यात येणार असून भाग्यवान विजेत्याला सोन्याची नथ दिली जाईल. प्रश्नमंजुषेसाठी 100 मानाच्या पैठणी दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक उपस्थित महिलेला आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.

प्रदीप आबा तापकीर यांच्याकडे राष्ट्रवादीचा युवा चेहरा म्हणून पाहिले जाते. त्यांनी च-होली परिसरात राष्ट्रवादीची बीजे खोलवर रुजविली आहेत. त्यांच्यामुळे च-होली राष्ट्रवादीत चैतन्य निर्माण झाले आहे. त्यांच्या पत्नी विनया तापकीर सलग दोनवेळा निवडून आल्या आहेत. (Pradeep Tapkir) राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी च-होलीचे महापालिकेत प्रतिनिधीत्व केले. तापकीर दाम्पत्य सदैव च-होलीकरांच्या सेवेसाठी तत्पर असते. च-होली परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.