Chinchwad News : आक्रमक राहणे ही काळाची गरज- लतेंद्र भिंगारे

एमपीसी न्यूज प्रत्येक विद्यार्थीनींनी जिद्द, प्रयत्न, सहनशीलता या तीन गोष्टी अंगिकाराव्यात, सहनशिलते बरोबरच आजच्या काळात आक्रमक राहणे देखील तेवढेच गरजेचे आहे, असे मत प्रशिक्षक लतेंद्र भिंगारे यांनी चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित (Chinchwad News) प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज इन्स्टिट्युटमधील विद्यार्थिनींना मर्दानी प्रशिक्षणमोहीम मध्ये मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, समन्वयक प्रा. रुतुजा चव्हाण, प्रा. सुरुची सोमवंशी, प्रा. तुलुका चटर्जी, प्रा. ज्योती इंगळे आदी उपस्थित होते.महाविद्यालयात ‘निर्भया कन्या अभियान’ राबविण्यात येत आहे. निनाद फाऊंडेशनचे संस्थापक अजय भोसले यांच्या समवेत विद्यार्थीनींसाठी तीन दिवसीय ‘मर्दानी प्रशिक्षण’ मोहीम राबविण्यात येत आहे ज्यामध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून लतेंद्र भिंगारे हे प्रशिक्षण देत आहेत.

यावेळी पुढे बोलताना भिंगारे म्हणाले की, रोजच्या जीवनात कला, क्रीडा, क्षेत्राकडे दुर्लक्ष करू नका. आपला अनमोल वेळ वाया घालवू नका. आवाजात आक्रमकता ठेवा दोन शब्द लक्षात ठेवा ऐकून घेण्याची क्षमता असते, तो निर्णय घेतो तोच यशस्वी होतो. आहारावर विशेष लक्ष द्यावे, तात्पुरते आयुष्य जगू नका. (Chinchwad News) तुम्ही इतरांचे कौतुक करता. परंतु, तुमचे कौतुक इतराने करावे, ही भूमिका प्रत्येकाने आपले जीवन जगताना अंगिकारावे, आपले व्यक्तिमत्व कसे सुधारेल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे मत व्यक्त केले.

Pune : आपतर्फे चंद्रकांत पाटील यांना शैक्षणिक साहित्य पाठवून निषेध

यावेळी सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, संस्था महाविद्यालयात विविध शाखेत शिक्षण घेणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी सदैव प्रयत्नशील असते. (Chinchwad News) विद्यार्थीनींना शिक्षणाबरोबरच त्याचे आरोग्य मानसिक, शारिरीकदृष्ट्या सक्षमीकरण होण्यासाठी समुपदेशन व प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुलीका चटर्जी यांनी केले. तर, प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयिका प्रा. रुतूजा चव्हाण, प्रा. सुरूची सोमवंशी, प्रा. ज्योती इंगळे, निनाद फाऊंडेशनचे प्रशिक्षक भाग्यश्री बोराटे, श्रीकांत तिळवे, कल्याणी दारवटकर, वैभवी सोनावणे, सचिन खटके आदींनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.