Dehu road : दुरुस्तीसाठी दिलेल्या डंपरची बॉडी विकून केली सव्वा लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज – दुरुस्तीसाठी दिलेल्या डंपरची बॉडी विकून डंपर मालकाची 1 लाख 25 हजारांची फसवणूक केली. ही घटना 22 ऑगस्ट ते 12 डिसेंबर या कालावधीत (Dehu road)ध्रुव ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा ली, देहूगाव येथे घडली.

प्रीतम नंदकुमार गंजेवार (वय 34, रा.पुणे ) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलेश पांचाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचा इन्फी लीग मोटरस्पोर्टसोबत सामंज्यस करार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गंजेवार यांनी त्याचे दोन हायवा डंपरच्या पाठीमागील लोखंडी बॉडीचे काम करण्यासाठी ध्रुव ऑटोमोटिव्ह इंडिया या कंपनीत दिले.(Dehu road) आरोपीने दोन्ही डंपरच्या पाठीमागील बाजूचे लोखंडी हौद फिर्यादींच्या परस्पर विकून त्या पैशांचा अपहार करून 1 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.