Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचा इन्फी लीग मोटरस्पोर्टसोबत सामंजस्य करार

एमपीसी न्युज – पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचा इन्फी लीग मोटरस्पोर्ट (Talegaon Dabhade) सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. त्याच अनुषंगाने इन्फी लीग मोटरस्पोर्ट आयोजित अरावल्ली टेराइन व्हेईकल चॅम्पियनशिप सीझन सहाचे नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये लवकरच आयोजन करण्यात येत आहे.

या कराराप्रसंगी इन्फी लीग मोटरस्पोर्टचे व्यवस्थापक भावीण भंडारी, चंद्रेश शर्मा, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे खजिनदार राजेश म्हस्के, नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे, डॉ. नितीन धवस, प्रा. विशालसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये 20 राज्यातील उच्च स्तरीय अभियांत्रिकी महाविद्यालयासह 110 संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा प्रथमच महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. (Talegaon Dabhade) विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या गाड्या या स्पर्धेमध्ये असणार आहेत. याद्वारे मार्च 2023 मध्ये  दीडशेहून अधिक कंपन्या सहभागी होऊन अभियांत्रिकी आणि  डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी एनएमआयईटी महाविद्यालय आणि इन्फी लीग मोटरस्पोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

Pimpri News : नदी पात्रातील जलपर्णी काढा, हौउसिंग सोसायटी फेडेरेशनची मागणी

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पनांद्वारे  गाड्यांच्या निर्मिती प्रक्रियेमधील कौशल्य तयार व्हावेत, रेसिंग कारमध्ये विविध  संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठीच तंत्रज्ञान वापरले जावे, टीमवर्क आणि साहसीवृत्ती या सर्वांचा मिलाप होण्यासाठी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.