Pimpri News : नदी पात्रातील जलपर्णी काढा, हौउसिंग सोसायटी फेडेरेशनची मागणी

एमपीसी न्यूज : शहरातील इंद्रायणी, पवना, आणि मुळा या नद्यांच्या पात्रातील जलपर्णी काढावी व विविध कंपन्यांचे केमिकल मिश्रीत पाणी या नदीमध्ये सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी चिखली, मोशी व पिंपरी-चिंचवड हौउसिंग सोसायटी फेडेरेशन यांनी केली आहे.(Pimpri News) यबाबतचे पत्र फेडेरेशचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे आरोग्यमंत्री व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक शेखर सिंह यांना पाठविले आहे.

सांगळे या पत्रात म्हणतात की, पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी, पवना व मुळा या नद्यांच्या पात्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढलेली आहे. त्यामुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत आहे. तसेच नुकतेच पुणे शहरात झिका या डासांपासून होणाऱ्या भयंकर आजाराचे आपल्या शेजारील शहरात रुग्ण सापडले आहेत. झिका हा आजार स्वछ साठलेल्या पाण्यात पैदास होणाऱ्या एडिस इजिप्ती या डासाच्या चावल्याने होते. या डासाची पैदास प्रामुख्याने या जलपर्णी असणाऱ्या नदी प्रवाहात होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा विषय असल्याने या तिन्ही नद्यांमधील जलपर्णी ताबडतोब काढावी ही विनंती. अन्यथा झिका हा आजार मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे.

Charholi News : चऱ्होली मधील आझाद नगर येथील गादी कारखान्यास आग

तसेच या तिन्ही नद्यांच्या आजूबाजूच्या कंपन्या व कारखान्यांमधून निर्माण होणारे केमिकलयुक्त पाणी या नद्यांच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे या नद्यांचे खूप मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषित होत आहे. तरी संबंधित कंपन्या व कारखाने यांच्यावर कारवाई करावी व हे पाणी सोडणे बंद करण्यास सांगावे आणि नद्यांचे पावित्र्य अबाधीत राखावे असे सांगळे यांनी म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.