Charholi News : चऱ्होली मधील आझाद नगर येथील गादी कारखान्यास आग

एमपीसी न्यूज : बुधवारी दि.13 दुपारी पावणे एक च्या सुमारास (Charholi News) चऱ्होली मधील आझाद नगर येथे असणाऱ्या गादी काखान्यास अचानक आग लागली होती. या आगीत गादी कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे.

चऱ्होली मधील आझाद नगर येथे असणाऱ्या गादी काखान्यास अचानक आग लागली होती. तेथील आगीचे स्वरूप पाहाता स्थानिक व्यक्तीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला संपर्क साधला. त्यानंतर अग्निशमन दल  घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळविले. तेथील नागरिकांनी सुध्दा आग विझवण्यासाठी मदत केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागाचे  लिडिंग फायरमन चंद्रशेखर घुले म्हणाले की, हा कारखाना सुमारे 1 गुंठे क्षेत्रात आहे. कारखान्यातील कापूस, पडदे, मशिनरी व जल शुद्धीकरण प्लांट या आगीत जळून गेले आहे. सुमारे 30 मिनिटात ही आग विझवण्यात आली होती.

Maval : सनराइज मेडिकल फाउंडेशनच्या मावळ तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय पडवळ

येथील गादी कारखान्याचे आगी मध्ये मोठ्या प्रमाणात नुसकान झाले आहे. (Charholi News)तसेच  शेजारी असणाऱ्या पाण्याच्या प्लांटचे नुसकान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झालेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.