Maval : सनराइज मेडिकल फाउंडेशनच्या मावळ तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय पडवळ

एमपीसी न्युज – सनराइज मेडिकल फाउंडेशनच्या मावळ तालुका अध्यक्षपदी दत्तात्रय आण्णा पडवळ यांची निवड करण्यात आली. (Maval) ही निवड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रोशन मराठे यांनी जाहीर केली. सनराइज मेडिकल फाउंडेशन ही संस्था आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.

सनराइज मेडिकल फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू रुग्णांना किडनी प्रत्यारोपण, लिव्हर प्रत्यारोपण, सर्व प्रकारचे  कॅन्सर शस्त्रक्रिया व लहान मुलांच्या हृदयामध्ये छिद्र असणाऱ्या शस्त्रक्रिया अशा अनेक प्रकारच्या दुर्धर आजार असलेल्या रुग्णांचे सर्व प्रकारचे उपचार मोफत केले जातात. संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर मोठमोठ्या महाआरोग्य शिबिरांचे आयोजन देखील केले जाते. तसेच अति दुर्गम भागातील खेड्यांमध्ये मोफत आरोग्य सेवा व मोफत औषधोपचार हा संस्थेच्या माध्यमातून केला जातो.

Shrirang Barne : रेल्वेच्या तिकीट दरातील 50 टक्के सवलत पत्रकारांना पुन्हा सुरू करा; खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी

आमच्या या सेवा कार्यामध्ये आपला हातभार लागावा व गोरगरीब रुग्णांची सेवा जास्तीत जास्त करता यावी याच उद्देशाने आम्ही सनराईज मेडिकल फाउंडेशन या आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून आपली मावळ तालुका विभाग प्रमुख म्हणून आपली नियुक्ती करीत आहोत.(Maval) आम्हास खात्री वाटते आहे व अभिमान देखील आहे की आपण आपल्या मावळ परिसरातील गोरगरीब व दीनदुबळ्यां  रुग्णांची सेवा करण्यामध्ये नेहमी अग्रेसरपणे काम कराल, असे पडवळ यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

दत्तात्रय पडवळ यांनी बोलताना सांगितले की, मावळ तालुक्यातील ग्रामीण अतिदुर्गम भागातील लोकांसाठी पुढील काळात प्रत्येक गावी जाऊन आरोग्य शिबिर घेतले जाईल.(Maval) योग्य ते डाॅक्टर यामध्ये असतील व निदान करून योग्य ते औषध त्याच ठिकाणी दिले जाईल व ज्यांना शस्त्रक्रियाची आवश्यकता असेल त्यांना पुणे अथवा मुंबई येथील मोठ्या हास्पिटल मध्ये शस्त्रक्रिया केली जाईल. ज्यांना काही आरोग्य संबंधित मदत पाहिजे त्यांनी संस्थेशी संपर्क करण्याचे आवाहन करत, एक फोन आणि मदत केली जाईल असा विश्वास दत्तात्रय पडवळ यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.