PCMC News : अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाल्यानंतर आई-वडिलांना सांभाळण्यास दिला जातोय नकार
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाल्यानंतर मुलांकडून आई-वडिलांना सांभाळण्यास नकार दिला जात असल्याच्या (PCMC News) तक्रारी प्रशासनाकडे सातत्याने येतात. या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पालिकेच्या वतीने वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्याची नेमणूक करण्यात आली आहे.
महापालिकेत कार्यरत असणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना आरोग्य संबंधी समस्या जाणवू लागल्याने काम करणे अवघड होते. अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह व्यवस्थित व्हावा, यासाठी अनुकंपा तत्त्वावर त्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्यात येते. लाड कमिटीच्या शिफारशी आणि अनुकंपा तत्वानुसार महापालिकेत नोकरी मिळते. मात्र, आई-वडिलांच्या जागी पालिकेत नोकरी मिळाल्यानंतर हीच मुले आई-वडिलांचा सांभाळ करण्यास नकार देत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे आई-वडील पालिका प्रशासनाकडे धाव घेत आहेत. या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पालिकेच्या वतीने वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्याची नेमणूक करण्यात आली आहे.
Chinchwad News : आक्रमक राहणे ही काळाची गरज- लतेंद्र भिंगारे
शासन निर्देशासार महापालिकेच्या सेवेमधील कर्मचा-यांच्या पात्र वारसांना अनुकंपा तत्वानुसार तसेच लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार वारस नियुक्त्या दिल्या जातात.(PCMC News) अशा पात्र वारसदार व्यक्तीद्वारे स्वत:च्या कुटुंबियांचा सांभाळ करण्याबाबत महापालिका सेवेत रुजू होण्यापूर्वी स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र किंवा बंधपत्र महापालिकेस सादर केली जातात. तथापि, कुटुंबियांचा सांभाळ न करणे तसेच स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र किंवा बंधपत्रातील तरतुदींचा भंग करीत असल्याच्या तक्रारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे केल्या आहेत. या तक्रारींचे निवारण समुपदेशनामार्फत करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
तक्रारी सोडवण्यासाठी समुपदेशक व लाभार्थी या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण व सामंजस्याने होणारे हेतुपूर्वक संभाषण आवश्यक आहे. समुपदेशन ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया असून त्याचा लाभार्थी आणि समुपदेशक या दोघांच्याही मानसिकतेवर परिणाम होतो. तसेच ते दोघे परस्परांच्या मानसिकतेवर परिणाम करीत असतात. त्यामुळे लाभार्थीत स्वत:मध्ये बदल होऊन तो स्वतःच्या समस्या स्वतः सोडविण्यास समर्थ होतो.
तक्रारी अर्जासंबंधित कर्मचाऱ्यांच्या वर्तनात सुधारणा करण्यासाठी व समुपदेशनाद्वारे तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापालिका आस्थापनेवरील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (PCMC News) आणि कामगार कल्याण विभाग यांच्या समन्वयाने समुपदेशकामार्फत तक्रारींचे निवारण करण्यात येणार असून यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाची मदत घेण्याबाबत परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.