Swami Smaranand Maharaj : रामकृष्ण मठ आणि मिशनचे प्राचार्य स्वामी स्मरणानंद महाराज यांचे निधन

एमपीसी न्यूज – रामकृष्ण मठ आणि मिशनचे प्राचार्य स्वामी स्मरणानंद महाराज (Swami Smaranand Maharaj) यांचे मंगळवारी निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. रामकृष्ण मिशन सेवा संस्थानमध्ये मंगळवारी रात्री 8.14 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 29 जानेवारीला मूत्रमार्गात संसर्ग झाल्यामुळे रामकृष्ण मिशन सेवा प्रतिष्ठानमध्ये दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगाल दौऱ्यावर असताना त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले होते .स्वामी स्मरणानंद महाराज रामकृष्ण मठ आणि मिशनचे 16 वे प्राचार्य होते.

Today’s Horoscope 27 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

स्वामी स्मरणानंद महाराज यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून ते  म्हणाले,  रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मशिनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंदजी महाराज यांनी आपलं जीवन अध्यात्म आणि सेवा कार्यासाठी समर्पित केले, महाराजांनी असंख्य मनांवर व बुद्धीवादींवर आपला प्रभाव निर्माण केला आहे. त्यांची करुणा आणि बुद्धीमता पुढील पिढ्यांसाठी कायम प्रेरणा असेल, असे म्हणत मोदींनी स्वामीजींच्या निधनानंतर श्रद्धांजली अर्पण (Swami Smaranand Maharaj)  केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.