Today’s Horoscope 27 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 27 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – बुधवार.

तारीख – 27.03.2024.

शुभाशुभ विचार- शुभ दिवस.

आज विशेष – संत तुकाराम महाराज बीज.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.

दिशा शूल – उत्तरेला असेल.

आज नक्षत्र – चित्रा 16.16 पर्यंत नंतर स्वाती. 

चंद्र राशी – तुळ.

—————————–

मेष ( शुभ रंग- भगवा)

कार्यक्षेत्रात यशाचा मार्ग अनुकूल होईल. आज तुम्ही जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न कराल. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका.

वृषभ (शुभ रंग- सोनेरी)

आज तुम्ही काही आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त असाल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज वैवाहिक जीवनातील काही मतभेद संध्याकाळी निवळतील. शब्द जपून वापरा.

मिथुन (शुभ रंग – पिस्ता)

दुकानदारांची उधारी वसूल होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येईल. आज वैवाहिक जीवनात जुन्या फोटोंचा अल्बम चाळणी हिताचे राहील.

कर्क ( शुभ रंग- क्रीम)

हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील. आज गृहिणी घर सजावटीवर भर देतील. कलाकारांना मात्र प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

सिंह ( शुभ रंग- मरून)

वास्तु व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळले तर बरे होईल. गृहिणींना माहेरची ओढ लागेल. विद्यार्थी अभ्यासाचा कंटाळा करतील. प्रवासात नवीन नाती जुळतील.

कन्या (शुभ रंग- चंदेरी)

राशीच्या धनस्थानातील चंद्रभ्रमण आवक वाढवेल. पैशाअभावी रखडलेली कामे आज पूर्ण करू शकाल. गायक कलाकार प्रसिद्धीच्या झोतात राहतील.

तूळ (शुभ रंग- डाळिंबी)

आज तुम्ही आपल्याच मनाप्रमाणे वागाल. थोडी अहंकाराची बाधा होऊ शकते. कठोर बोलण्याने नाती दुरावण्याची शक्यता आहे. कुणालाही मोफत सल्ले वाटप करू नका.

वृश्चिक ( शुभ रंग- लाल)

काही जणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल. कठोर बोलण्याने नाती दुरावतील. अनावश्यक बोलूच नका.

धनु (शुभरंग- आकाशी)

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज मनाप्रमाणे खर्चही करता येईल. प्रिय मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. दिवस लाभाचा.

मकर (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज तुम्ही आळस झटकून कामाला लागल पण अति उत्साहाच्या भरात काही चुकीचे निर्णय घ्याल. हाती असलेला पैसा जपून वापरा. आज महत्त्वाचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका.

कुंभ ( शुभरंग- पांढरा)

कार्यक्षेत्रात ध्येय प्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. महत्त्वाच्या चर्चेत सुसंवाद साधा.

मीन (शुभ रंग- जांभळा)

कामाच्या ठिकाणी विरोधक चुका काढण्यासाठी टपून बसलेत. वरिष्ठांचे काही केले तरी समाधान होणे शक्य नाही. आज धाडसाची कामे टाळा. नाकासमोर चाला.

 शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.