Pune : पुणे शहरात मंगळवारी तापमानाने गाठली चाळीशी

एमपीसी न्यूज – दिवसें-दिवस राज्याचे तापमान वाढत आहे. पुणे शहरात मंगळवारी ( Pune) तापमानाने चाळीशी गाठली . काल पुणे शहर परिसरातील लवळे येथे  40.9 अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. या  उष्णतेच्या झळा पुढील तीन-चार दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Swami Samranand Maharaj : रामकृष्ण मठ आणि मिशनचे प्राचार्य स्वामी स्मरणानंद महाराज यांचे निधन

मंगळवारी सकाळपासूनच उन्हाचा झळा जाणवत होत्या. दुपारी 12 ते 4 दरम्यान उन्हाची तीव्रता बरीच  वाढली  .लवळे येथे मंगळवारी 40.9 अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. पाषाण, लोहगाव आणि मगरपट्टा येथे कमाल तापमानाच्या पाऱ्याने 39 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी यंदाच्या उन्हाळ्यातील 38.9 अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान कायम राहिले.

शहरासह जिल्ह्यात मागील आठ दिवसांपूर्वी शहरातील कमाल तापमान 35 ते 36 अंशावर असले तरी किमान तापमान 12 ते 15 च्या जवळपास होते. त्यामुले दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री गारवा अशी परिस्थिती होती. मागील, मागील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानासह किमान तापमानातही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे रात्रीचा गारवा कमी होवून उकाडा वाढू लागला ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.