BNR-HDR-TOP-Mobile

Khed-Shivapur : जुगार अड्ड्यावर छापा; 44 आरोपींसह तब्बल सात लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – खेड शिवापूर येथे जुगार अड्ड्यावर बारामती क्राईम ब्रँच पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 44 आरोपींना ताब्यात घेतले असून तब्बल सहा लाख 82 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पेट्रोलिंग करीत असताना खेड-शिवापूर येथे पत्र्याच्या शेडमध्ये पत्या मटका सुरत खेळत आहे, अशी माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे बारामती क्राईम ब्रँच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये एकूण 44 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून त्यांच्याकडून एक लाख 59 हजार 790 रुपये रोख रक्कम पाच हजार किंमतीचे 40 मोबाईल तीन तीन लाख पन्नास हजाराची चार चाकी गाडी 90 हजाराच्या नऊ मोटरसायकली आणि 17 हजार 600 रुपयाचे जुगाराचे साहित्य असे मिळून सहा लाख 82 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपी फरार झाले आहेत.

.