Pune News : जुगार खेळताना 26 जणांना रंगेहात पकडले

पुण्याच्या नाना पेठेतील घटना

एमपीसी न्यूज : नाना पेठेत सुरूअसलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकला. याप्रकरणी जुगार चालविणा-यासह  २६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने  कारवाई केली आहे.

जुगार अड्डा चालविणा-या सोमनाथ सयाजी गायकवाड (३६, रा. नाना पेठ) आणि अशोक सिंग अंबिका सिंग (३६, रा. गोपी चाळ, दापोडी) यांच्यासह पोलिसांनी २६ जणांविरूध्द समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अड्डयावरून २ लाख १८ हजार ६८० रूपयाचा ऐवज जप्त करून १४ मोबाईल जप्त केले आहेत.

महेशकुमार जाधव वय ३४ रा.दापोडी, ओंकार उमेश बनसोडे वय २० रा. आंबेगाव पठार, सुरज अशोक कासट वय ३४ रा. शुक्रवार पेठ, सुनिल मारूती दळवी वय ४५ रा. सोमाटणे फाटा, अशोक लस्मण ओव्हाळ वय ६४, बाबासाहेब भाऊसाहेब साठे वय ३५, उमेश नंदु किरवे वय २३  आंबेगाव पठार, अक्षय गोरख भापकर वय २६, इस्माईल मैनुददीन उस्ताद वय ३२, प्रभाकर बळिराम पवार वय ६०, राजीक मेहबुब शेख वय २२, कुंदनकुमार प्रद्रिप साव,  राजेश कुमारेसन वय ४५ सुर्यकांत कुमार सिंह वय ३६,  महाविर मंडल वय ३८, महेंद्र प्रसाद वय ४९ , प्रविण प्रसाद घोटाळे  वय ४२  कृष्णा तुकाराम पिनाटे वय ५०, अविनाश रामदास महामुनी वय ३०, गजानन दिलीप आसलकर वय २२, प्रफुल्ल दिलीप रणसिंग वय २२ मनिष संगप्पा निंबरगे वय २८, अनिल अनंत चुरी वय ५९ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.