Ankush Shinde : शाळा व महाविद्यालय आवरात विनाकारण फिरणारे रोड रोमिओंच्यावर पिंपरी चिंचवड पोलीस करणार कारवाई

एमपीसी न्यूज – शाळा व महाविद्यालय आवरात विनाकारण फिरणारे रोड रोमिओंच्यावर पिंपरी चिंचवड पोलीस कारवाई करणार आहे. याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी  (Ankush Shinde) सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत.

 

 

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व शाळा व महाविद्यालये पुर्ण वेळ सुरु झाले आहेत. त्यामुळे आयुक्त अंकुश शिंदे यांनी सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व शाळा व महाविद्यालय आवारात परिणामकारक पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले आहेत.

 

 

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अनुदानित व विनाअनुदानित शाळा व महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. अशा ठिकाणी शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शाळा व महाविद्यालये सुरू होताना व सुटल्यानंतर आवरात विनाकारण फिरणाऱ्या रोड्रॉमिओंकडून महिला व विद्यार्थिनींची छेडछाड (Ankush Shinde) होण्याची किंवा काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांना आपापल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अनुदानित व विनाअनुदानित शाळा व महाविद्यालय यांना वेळोवेळी भेटी देऊन परिणामकारक गस्त वाढविण्याबाबत आदेश दिले आहेत.

 

 

Pcmc Elecation 2022: अंतिम मतदार याद्या अद्यापही प्रसिद्ध नाहीत, घोळात-घोळ सुरुच, नागरिकांचा हेलपाटा

 

 

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालाय हद्दीतील सर्व सुजाण नागरिकांना (Ankush Shinde) पोलिसांनी आवाहन केले आहे की आपल्या परिसरातील शाळा व महाविद्यालय ठिकाणी महिला व विद्यार्थिनींशी छेडछाडीचा अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष व जवळील पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. गैरकृत्य करणाऱ्या रोड रोमिओंवर पोलीस विभागाकडुन तात्काळ कारवाई करण्यात येईल. हेल्पलाईन नंबर – 112, नियंत्रण कक्ष फोन नंबर – 020-27352500

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.