Lonavala News : बेगडेवाडी’ आता होणार ‘भेगडेवाडी’ रेल्वे स्टेशन, भारतीय सर्वेक्षण विभागाकडून दुरुस्ती

एमपीसी न्यूज – बेगडेवाडी रेल्वे स्थानक पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील जुन्या पुणे – मुंबई महामार्गालगत असलेल्या शेलारवाडी गावाजवळील रेल्वे स्थानक आहे. घोरावाडी व देहूरोड स्टेशन (Lonavala News) दरम्यान असलेले बेगडेवाडी स्टेशनचे बेगडेवाडी हे नाव दुरुस्त करून ते भेगडेवाडी करण्यात यावे,या संदर्भात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची भेट घेऊन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे.

 

Chikhali News : देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पोस्ट ऑफिस’ आपल्या दारी उपक्रम

 

 

दरम्यान भारतीय सर्वेक्षण विभाग, भारत सरकारच्या माध्यमातून बेगडेवाडी हे नाव दुरुस्ती (Lonavala News) करून भेगडेवाडी असे करण्यात आले. त्या संदर्भात सर्वेक्षण करून अंतिम अहवाल भारतीय सर्वेक्षण विभाग व भारत सरकारकडे देण्यात आला.

 

 

Happy News : गणेशोत्सव, दहीहांडी यंदा निर्बंधमुक्त; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

 

भेगडेवाडी रेल्वे स्टेशनचा शेलारवाडी शिवाय घोरावाडी डोंगर लेणी, कुंडमळा, सोमाटणे व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमसाठी जाणारे या स्थानकाचा वापर करतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.