PCMC : महापालिका नाट्यगृहाचे खाजगीकरण कोणाचे पुनर्वसन करण्यासाठी?- इम्रान शेख

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने (Pcmc)  शहरातील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह सोडून उर्वरित आचार्य अत्रे नाटयगृह, अंकुशराव लांडगे नाटयगृह, नटसम्राट निळू फुले नाटयगृह, हया नाटयगृहांचे खाजगीकरण करण्याचा घाट घातलेला आहे. हा घाट कोणाचे पुनर्वसन करण्यासाठी घातला आहे असा सवाल करत खाजगीकरणाला शहर राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे.

Maval : विकास कामांचा धडाका, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते तीन कोटींच्या कामांचे भूमीपूजन

युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, खाजगीकरणामुळे नाट्यगृहाचे भाडेवाढ होऊन त्याचा परिणाम साहित्यिक कार्यक्रम, नाट्य प्रयोग करणाऱ्या संस्था, सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय कार्यक्रम व कामगार मेळावे, राजकीय पक्षांचे कार्यक्रम यावर परिणाम होऊ शकतो. महापालिका (Pcmc) नाट्यगृहाचे खाजगीकरण कोणाचे पुनर्वसन करण्यासाठी केले जात आहे.

चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड म्हणाले, महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा एकतर्फी निर्णय घेताना शहरातील कलाकारांना अथवा सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व नागरिक यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेऊ नये. अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आपणाविरोधात तीव्र अंदोलन घेण्यात येईल असा इशारा दिला आहे .

महापालिका उपायुक्त प्रदीप जांभळे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड, पिंपरी (Pcmc) विधानसभा अध्यक्ष आयुष निंबारकर, युवक उपाध्यक्ष ओम शिरसागर, सचिव पियूश अंकुश, रुबान शेख,सनी वाघमारे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.