Maval : मावळ तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी विशाल वहिले

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या (शरद पवार गट) अध्यक्षपदी विशाल वसंतराव वहिले यांची (Maval) निवड झाली. वडगाव ग्रामपंचायत असताना वडगावचे उपसरपंच विशाल वहिले यांनी उपसरपंच म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस पदावर काम केले आहे. जनसामान्यांची काम करून पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडणार असल्याचे विशाल वहिले यांनी सांगितले.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जगन्नाथ बापु शेवाळे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल गायकवाड , पुणे जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत , पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे, पुणे जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, उद्योजक राजेश बाफना, मावळ तालुका अल्पसंख्याक सेल चे मा. अध्यक्ष अफताब सय्यद युवा नेते सोमनाथ धोंगडे, विजय शिंदे ,अमोल जांभुळकर, सौरभ सावले, अशिष वहिले, पंकज भामरे, अभिजीत ढोरे, लौकिक सासवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Stock Market : निफ्टीने गाठला विक्रमी उच्चांक; तर BSE सेन्सेक्समध्येही वाढ

 

आपल्या सर्वांच्या सहकार्याने व आशीर्वादाने आज माझी मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस “अध्यक्षपदी “ निवड करण्यात (Maval) आली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे युवकांचे संघटन करण्यासाठी संधी देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात पक्षाचा जास्तीत जास्ती प्रचार, युवा संघटन करून सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल. पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत जनतेसाठी कार्य करणार. मावळ तालुक्यात संघटनात्मक कामाला प्रथम प्राधान्य देणारा असून, ज्येष्ठ नेते मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटनात्मक काम मी करणार आहे, असे मत विशाल वसंतराव वहिले यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.