Pune Crime News : धक्कादायक! अर्ध्या वयाच्या प्राध्यापिकेला 54 वर्षीय प्राध्यापकाने मारली मिठी

एमपीसी न्यूज – दहावी-बारावीच्या परीक्षा नुकत्याच पूर्ण झाल्या आहेत. या परीक्षेचे पेपर वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांकडे तपासणीसाठी देण्यात आले आहेत. पुण्यात एका महाविद्यालयाच्या प्राध्यापकाकडे समन्वयाचे जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार महाविद्यालयातील प्रोफेसर पेपर तपासल्यानंतर त्याच्याकडे जमा करत होते. पेपर जमा करण्यासाठी या प्राध्यापकाकडे आलेल्या एका 27 वर्षीय तरुणीचा त्याने विनयभंग केला. या प्रोफेसर तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिला मिठी मारून तिचा विनयभंग केला. 14 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील एका शैक्षणिक संकुलात ही घटना घडली.

या घटनेनंतर संबंधित प्रोफेसर तरुणीने आपल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. कुटुंबियांनी पोलीस स्टेशन गाठून संबंधित प्रोफेसर विरोधात तक्रार दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून विकास पवार याला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.