Pimpri : कला संशोधनासाठी ज्येष्ठ पत्रकार विश्वास मोरे यांना पीएचडी

एमपीसी न्यूज – पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार विश्वास मोरे यांना पत्रकारिता विषयात पीएचडी जाहीर झाली आहे. पत्रकारिता आंतरविद्याशाखेअंतर्गत लोककला, ललितकला एक सामाजिक प्रबोधन, ऐतिहासिक अभ्यास असा संशोधनाचा विषय होता. 

सामाजिक प्रबोधनात कला या माध्यमाची असणारी भूमिका, त्यातून होणारे कला संवर्धन, कलेचा सामाजिक घटकांवर झालेला परिणाम, माध्यमांनी कला संवर्धनात बजावलेली भूमिका सकारात्मक की नकारात्मक यांचा अभ्यास संशोधनात केला आहे. माध्यमांनी कला संवर्धनासाठी बजावलेली भूमिका, समाज परिवर्तनात कलांची भूमिका याचा अभ्यास केला आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक, विद्यावाचस्पती लोक आणि संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, माध्यम विभागाच्या प्रमुख डॉ. गीताली टिळक- मोने, इतिहास विभागाचे प्रमुख व्ही. डी कुलकर्णी यांनी संशोधनासाठी मार्गदर्शन केले. 

मोरे हे संत साहित्य आणि कला साहित्याचे अभ्यासक सामाजिक अभिसरण आणि सामाजिक परिवर्तनात महाराष्ट्रातील लोककला आणि अभिजात अशा ललितकला या माध्यमाने महत्वाची भूमिका मांडली बजावली आहे. त्यातून घडणारे परिवर्तन, समाजातील घटकांवर झालेला परिणाम याचा अभ्यास संशोधनात केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.