Pune news : जिल्ह्यात 50 हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त

एमपीसी न्यूज – अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने (Pune news) पुणे जिल्ह्यात सुमारे 50 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आले आहे.

हडपसर भाजीपाला बाजार, मे. नटराज पान दुकान, शरणअप्पा बेलुरे यांचे सुंदर कॉलनी, पवार नगर, थेरगाव येथील निवासस्थान,  मे. भगवानबाबा पान दुकान, कोंढवा बु., मे. प्रिया पान स्टॉल, चिंचवड स्टेशन, चिंचवड या चार ठिकाणी धाडी टाकून प्रतिबंधित पदार्थाचा सुमारे 41 हजार रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

Alandi news : शालेय किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य शिक्षण कार्यक्रमांअंतर्गत परिवर्तन पुस्तकाचे वाटप

गार्णीश पान दुकान, त्रिमूर्ती चौक, धनकवडी आणि मे. न्यु जयनाथ पान दुकान, आंबेगाव, पुणे या दोन ठिकाणी धाड टाकून प्रतिबंधित पदार्थाचा सुमारे 9 हजार रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे.(Pune news) या प्रकरणी दोन जणांविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे.

पुणे विभागातील सर्व किराणा, पान टपरी अशा अन्न पदार्थाच्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानातून प्रतिबंधित पदार्थाची विक्री करु नये.(Pune news) अन्न किंवा औषध संबंधात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.