Baramati News: शाईफेक करून निषेध करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही- अजितदादा पवार

एमपीसी न्यूज: त्यांनी असे वक्तव्य केले म्हणून त्यांच्यावर शाई फेकणे हेही तितके चुकीचे आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कोणी कायदा हातात घेऊ नये. मी या घटनेचा निषेध करतो, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य बारामतीमध्ये (Baramati News)केले.

Chinchwad News: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक प्रकरणातील आरोपींना 14 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

“भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी, “फुले , आंबेडकर यांनी भीक मागून शिक्षण संस्था उभ्या केल्या असे वक्तव्य केले होते. ते पूर्ण चुकीचे आहे. त्याचा मी निषेधच करतो असे अजित पवार बारामतीमध्ये (Baramati News) एका खाजगी कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना म्हणाले.

पवार म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील यांनी जे वक्तव्य केले आहे. त्याबाबत आमची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केलेली आहे. त्यांच्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करत नाही.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.