Punawale News : गरवी गुजराती समाजाच्या वतीने गरबा उत्सव उत्साहात सुरू

एमपीसी न्यूज : गरवी गुजराती समाजाच्या (Punawale News) वतीने गरबा उत्सव पुनावळे येथे उत्साहात साजरा करण्यात आला. हे उत्सवाचे 35 वे वर्ष आहे. हा उत्सव सेक्टर 25 प्राधिकरण येथे आयोजित करण्यात आला. गेली सहा वर्षे पुनावळे येथील मुद्रा लोन्समध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करत आहेत.
प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला गुजरातमधून गायक, कलाकार व ऑर्केस्ट्रा बोलवण्यात येतात. त्यामुळे येथे येणाऱ्यांना अस्सल गुजराती गाणी व संगीताच्या तालावर नाचण्याचा अनुभव मिळतो. प्रत्येक रात्री 12 पारितोषिके दिली जातात, जसे बेस्ट ड्रेस्ड पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक पुरुष, ज्येष्ठ नागरिक महिला आणि बालक अशांचा यामध्ये समावेश असतो.

खवय्यांसाठी अस्सल गुजराती खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येथे विविध स्टॉल्स आहेत. डिश गोला, फाफडा, उंधियो इतर गुजराती खाद्यपदार्थ या स्टॉल्सवर उपलब्ध आहेत. गरवी गुजराती (Punawale News) समाजाचे सह खजिनदार हार्दिक जानी म्हणाले, की येथील हॉलची क्षमता तीन हजार लोकांची आहे. दररोज येथे सुमारे दीड ते दोन हजार लोक गरबा खेळण्यास येतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.