Pune : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत आयोजित महारोजगार मेळाव्यात 639 उमेदवारांची रोजगारासाठी निवड

एमपीसी न्यूज – ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत (Pune) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जेजुरी येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात नोंदणी केलेल्या 1 हजार 29 उमेदवारांपैकी 639 उमेदवारांची रोजगारासाठी जागीच निवड करण्यात आली.

महारोजगार मेळाव्यात निवड झालेल्या 3 उमेदवारांचे नियुक्तीपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

या मेळाव्यासाठी महास्वयम् पोर्टलवर रोजगारासाठी बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली केली होती. तसेच उद्योजकांनी विविध पात्रतेच्या रिक्त पदांची मागणी नोंदविली होती. या (Pune) महारोजगार मेळावा कार्यक्रमामध्ये 5 हजार 395 रिक्त पदांच्या भरतीसाठी 32 उद्योजकांनी सहभाग नोंदविला. या मेळाव्यामध्ये 1 हजार 29 उमेदवारांची नोंदणी झाली. त्यानुसार सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेऊन 639 उमेदवारांची निवड करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.