Pune : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा

एमपीसी न्यूज – पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने(Pune ) भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे प्रशांत जगताप कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, ‘‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढची 500 ते1000वर्षे डोळ्यासमोर ठेवून भारताची राज्यघटना तयार केली.

26 जानेवारी 1950 पासून देशात राज्यघटना अंमलात (Pune )आणली गेली. भारताची ओळख एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून निर्माण झाली. परंतु, गेली 10 वर्षे चूकीच्या पध्दतीने देशाच्या कारभार चालू आहे. स्वातंत्र्य मिळूनही आपण आज पारतंत्र्यात आहोत, असे वाटायला लागले आहे. आपण सर्वांनी एकत्र व एकजुटीने राहून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचाच खासदार व्‍हायला पाहिजे हा संकल्प प्रजासत्ताक दिनी करूया.’’

यानंतर माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे म्हणाले की, ‘‘आजचा प्रजासत्ताक दिन आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. काँग्रेसच्या राजवटीत किती स्वताई होती आणि आता किती महागाई व बेरोजगारी वाढली आहे हे पाहत आहोत. आज देशावर हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न चालू आहे. आपण सर्व एकसंघ होऊन जाती धर्माच्या राजवटीला गाडले पाहिजे. संविधान वाचले तरच देश वाचेल.’’

Maval : साहित्य उत्कर्ष मंडळ मावळ तालुका यांच्या ज्येष्ठ नागरिक निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ साजरा

यावेळी माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, लता राजगुरू, अविनाश बागवे, अजित दरेकर, रफिक शेख, भिमराव पाटोळे, अनिल सोंडकर, संगीता तिवारी, नीता रजपूत, सुनिल शिंदे, पुजा आनंद, प्रकाश पवार, भुजंग लव्‍हे, राजेंद्र भुतडा, रवि ननावरे, यशराज पारखी, बाळासाहेब मारणे, रमेश सोनकांबळे, राजू ठोंबरे, आसिफ शेख, संतोष पाटोळे, अजित जाधव, हेमंत राजभोज, द. स. पोळेकर, सोमेश्वर बालगुडे, प्रदीप परदेशी, मारूती माने, विक्की खन्ना, वाल्मिक जगताप, जयकुमार ठोंबरे, हेरॉल्ड मॅसी, अनुसया गायकवाड, शोभना पण्णीकर, सुनिता नेमुर, जयश्री बुलबुले, ज्योती परदेशी, रजिया बल्लारी, शारदा वीर, अंजली सोलापूरे, कांता ढोणे, जगदीश जगताप, मोहन आवळे, हरिदास अडसूळ आदींसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जयदेव गायकवाड, अंकुश काकडे, रविंद्र माळवदकर, मृणालिनी वाणी, श्रीकांत पाटील, अर्जुन गांजे, किरण जगताप, रोहन पायगुडे, किशोर कांबळे, दिपक कामठे, शशिकांत कदम, गणेश नलावडे, जुबेर शेख, प्रकाश म्हस्के, संजय गायकवाड, अरबाज जमादार आदी उपस्थित होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.