Pune: यशस्वी संस्थेचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न 

एमपीसी न्यूज – यशस्वी  एज्युकेशन सोसायटीच्या (Pune)इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट  सायन्स (आयआयएमएस)चा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न  झाला.

 

विद्यार्थ्यांमध्ये सांघिक  भावना  वाढीस  लागावी तसेच त्यांचे शारीरिक(Pune)  व मानसिक  स्वास्थ्य चांगले राहावे,  या हेतूने  संस्थेने  वार्षिक  क्रीडा महोत्सवाचे  आयोजन  केल्याचे  संस्थेचे संचालक  डॉ. शिवाजी  मुंढे यांनी  प्रास्ताविक करताना  सांगितले.

 

CAA : निवडणुकीआधी मोदी सरकारची मोठी घोषणा; आजपासून नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू

 

डॉ.मुंढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षणाबरोबरच खेळाचाही महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त क्रीडा  स्पर्धनमध्ये  सहभागी  व्हायला हवे.

 

दोन  दिवस चाललेल्या या वार्षिक  क्रीडा महोत्सवात आयोजित बुद्धिबळ,कॅरम व क्रिकेट स्पर्धेत  एमबीए  व एमसीएचे विद्यार्थीव विद्यार्थिनींचे  संघ  सहभागी झाले होते. स्पर्धेतील  विजेत्या विद्यार्थ्यांना  बक्षिसे व सहभागी  झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र  प्रदान  करण्यात  आली.

 

या वार्षिक  क्रीडा महोत्सवासाठी  हार्दिक धोका,अथर्व कुपळे,यश बेलोसे, रोहित मोरे, सिद्धी आढाव,राणी क्षीरसागर या विद्यार्थ्यानी विशेष  परिश्रम  घेतले. तर डॉ.पुष्पराज वाघ, पवन शर्मा, प्रा.युगंधरा पाटील, डॉ. मधुरा देशपांडे, प्रा.प्रशांत वाडकर यांच्यासह तसेच सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.