Pune Accident News : पुण्यात आज सकाळपासून लागोपाठ पाच अपघात, दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी

एमपीसी न्यूज – पुण्यातील मुंबई बंगळूर महामार्गावर आज सकाळपासून लागोपाठ पाच ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय तर सहा जण जखमी झाले आहेत. पाचशे मीटर अंतरावर झालेल्या या अपघाताने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे आहे. जखमी झालेल्यांमध्ये सहा महिन्याच्या बाळाचा ही समावेश आहे.

बंगळूर मुंबई महामार्गावरील कात्रज बोगदा ओलांडून पुण्याच्या दिशेने येत असताना हे सर्व अपघात झाले आहेत. या रस्त्यावर तीव्र उतार असल्यामुळे हे अपघात झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वप्रथम पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दोन ट्रक मध्ये झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला होता. तर दुसरा अपघात पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याच ठिकाणी झाला. दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक बसली. यात यात दोघांचा मृत्यू झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

तिसरा अपघात सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुंबई बंगळूर महामार्गावरील भुमकर चौकात झाला. यावेळी भाजीपाल्याची वाहतूक करणारा ट्रक सर्व्हिस रस्त्यावर उलटला. तर चौथा अपघात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्या ठिकाणी झाला आहे यामध्ये एका कंटेनरने पाच ते सहा वाहनांना धडक दिली यामध्ये एका पोलीस गाडीचा ही समावेश आहे. या अपघातात रिक्षा बसलेला चालक गंभीर जखमी झाला आहे तर रिक्षातील दोन प्रवासी देखील गंभीर जखमी झाले आहेत.

याशिवाय कात्रज-देहु रोड बायपास वर देखील एक भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि बसची धडक झाल्याने यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.