Pune : पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी श्री हनुमान तळेवाले मंडळ ट्रस्टचे कार्यकर्ते फलक घेऊन मिरवणुकीत सहभागी 

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला 24 तासांचा (Pune) कालावधी होऊन गेला आहे. तरी लक्ष्मी रोड,कुमठेकर रोड आणि टिळक रोडवर ढोल ताशा,डीजे च्या दणदणाटमध्ये मंडळाच्या विसर्जन मिरवणुक सुरू आहे.त्याच दरम्यान श्री हनुमान तळेवाले मंडळ ट्रस्टचे कार्यकर्त्ये पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठीच्या आशयाचे फलक हाती घेऊन विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.

मागील महिन्यात पुण्येश्वर पुनर्निर्माण समितीच्या वतीने पुणे महापालिकेच्या बाहेर भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलना दरम्यान आमदार नितेश राणे आणि आमदार महेश लांडगे (Pune) या दोन्ही नेत्यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार,नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याबद्दल एकेरी उल्लेख आणि वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली होती.

World Cup 2023 : 7 वर्षानंतर पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात

त्या विधानाच्या निषेधार्थ पुणे महापालिकेमध्ये अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने काळ्या फिती घालून आंदोलन केले. पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात या अधिकारी वर्गाच्या आंदोलनाबाबत रंगली होती आहे.

या सर्व घडामोडीनंतर आज विसर्जन मिरवणुकीत श्री हनुमान तळेवाले मंडळ ट्रस्टचे कार्यकर्ते ‘तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवराय, आई भवानी शक्ती दे, पुण्येश्वरला मुक्ती दे !’,’अयोध्या तो सिर्फ झाकी है, काशी और मथुरा अभी बाकी है ! ‘ या आशयाचे फलक हाती घेऊन विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.

तर यातून कसबा पेठ भागातील पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील अतिक्रमण हटविण्यात यावे,या मागणीकडे मंडळांच्या कार्यकर्त्यांनी  सर्वांचे लक्ष वेधून घेतले (Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.