Pune Airport : पुणे विमानतळावरील प्रवाशांचे पार्किंगचे कष्ट होणार कमी; ‘मल्टीलेव्हल पार्किंग’ प्रायोगिक तत्वावर सुरु

एमपीसी न्यूज : पुणे विमानतळावरील (Pune Airport) ‘मल्टीलेव्हल पार्किंग’ प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार आहे. विमानतळावरील निर्माण होणारी पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी हा उपाय करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे विमानतळावर चारचाकी आणि दुचाकी यांच्या पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. आणि यामुळेच ही समस्या सोडवण्यासाठी ‘मल्टीलेव्हल पार्किंग’ प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार आहे.

ही पार्किंग सुविधा एप्रिल 2022 पर्यंत पूर्ण होणार होती, परंतु, कोरोनामुळे ही काम सप्टेंबर 2022 पर्यंत लांबणीवर पडले. मात्र, आता हे काम पूर्ण झाले असून या चार मजली ‘मल्टीलेव्हल पार्किंग’चा वापर विमानतळ प्रशासन हे व्यावसायिक तत्त्वावर करणार आहे. इतकेच नव्हे, तर प्रत्येक मजल्यावर पार्किंगसोबतच खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि काही खासगी कार्यालयांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून या पार्किंगमधून विमानतळ प्रशासनाला मोठा महसूल प्राप्त होईल.

Railway gate closed : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावरील दोन रेल्वे फाटक दुरुस्तीसाठी बंद

ऑनलाईन आणि स्वस्त तिकीट दर

आता प्रचलित असलेल्या गुगल पे, फोन पे आणि पेटीएमद्वारे प्रवासी (Pune Airport) ऑनलाइन पेमेंट देखील करू शकतात. ही तिकीट तासानुसार आकारले जाणार आहे. प्रत्येकी तासाला अंदाजे 20 रुपये दर असू शकतो. इतक्या स्वस्त सुविधेमुळे आता विमानतळावरील प्रवाशांना पार्किंगसाठी दुसरी जागा शोधण्याचे कष्ट वाचणार आहेत. शिवाय विमानतळाला जोडणाऱ्या फूट-ओव्हर ब्रिजचे कामही पूर्ण झाले असल्याने या बहुस्तरीय पार्किंगवरील पुलावरुन प्रवाशांना थेट विमानतळावर जाता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.