Pune : आनंद विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – श्रीसंत गोरोबा शिक्षण संस्था संचलित आनंद विद्यानिकेतन हायस्कूल, श्री गोरोबा बाल विद्या निकेतन व हिंद इंग्लिश मिडियम स्कूल यांचा संयुक्तरित्या प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

वायुसेनेचे माजी विंग कमांडर नारायण पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या कार्यवाह तावरे मॅडम, उपाध्यक्ष डाॅ. सावंत, आर .के.फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती सोनाग्रा, प्रभागाच्या नगरसेविका मुक्ता जगताप, सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड, गोरोबा बाल विद्या निकेतनचे मुख्याध्यापक.सतीश पाटील, हिंद इंग्लिश मिडियमच्या मुख्याध्यापिका डाॅ. प्रिती मानेकर व तंत्र विभाग प्रमुख दशरथ गद्रे व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

मुख्याध्यापक नितिन घोगे यांनी प्रास्ताविक केले संतोष थोरात सरांनी संविधनाच्या उद्देशिकेचे वाचन करून सर्वांना पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. शालेय विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना मार्चपास परेडनी मानवंदना देण्यात आली. यानंतर विलास शिंदे, प्रशांत म्हेत्रे व उज्ज्वला पाटील तसेच प्राथमिक व इंग्लिश मिडियम स्कूल शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये विद्यार्थ्यांची भाषणे, देशभक्तीपर गीते, लेझिम, मानवी मनोरे यांचा समावेश होता. पाहूण्यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

सूत्रसंचालन लक्ष्मण मासाळ यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन तीनही शाळांमधील शिक्षकांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.