Pune : शुक्रतारा या कार्यक्रमात अनुराधा पौडवाल यांचा ‘अरुण दाते कला सन्मान’ने गौरव

एमपीसी न्यूज – अतुल अरुण दाते व अभय (Pune) गाडगीळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शुक्रतारा’ या सांगीतिक कार्यक्रमात आज सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा यावर्षीच्या अरुण दाते कला सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.

रामुभैय्या दाते स्मृती प्रतिष्ठान व पी एन गाडगीळ एक्सक्लुझिव्ह – नळ स्टॉप यांच्या वतीने ज्येष्ठ व्हायोलिन वादक रमाकांत परांजपे यांच्या हस्ते कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अभय गाडगीळ, दीपा गाडगीळ, मंजु अतुल दाते आदी उपस्थित होते.

याआधी पी एन गाडगीळ एक्सक्लुझिव्ह यांच्या नळ स्टॉप येथील दालनामध्ये ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांचा बुधवार (दि.10) अरुण दाते कला सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून, यंदा हा पुरस्कार अरुण दाते यांच्या 89 व्या जन्मदिनाचे औचित्य साधत, त्यांच्यासोबत अनेक वर्षे सहगायन केलेल्या अनुराधा पौडवाल व अनुराधा मराठे या दोन्ही गायिकांना देण्यात आला. सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

Pune : पर्यावरण प्रेमींकडून वेताळ टेकडी प्रकल्प रद्द करण्याची जोरदार मागणी

पुरस्काराला उत्तर देताना अनुराधा मराठे म्हणाल्या, अरुण दातेंसारख्या लोकप्रिय गायकाने मला सहगायिका म्हणून स्वीकारणे हा माझा सन्मान होता असे मी मानते. मी लहाणपणीपासून त्यांची गाणी ऐकत आले, त्यांच्याशी आपली भेट व्हावी ही माझी इच्छा पुढे पूर्ण झाली शिवाय देश परदेशातील कार्यक्रमांमध्ये त्यांच्यासोबत गाता आलं, त्यांच्यासारख्या कलाकाराचा दीर्घ सहवास लाभला. अरुण दाते हे एक दिलदार व्यक्तीमत्त्व होतं.

यांना सहकलाकारांची कदर होती, सहकलाकारांचे तोंड भरून कौतुक ते करायचे, खूप कमी जण असे असतात त्यात अरुण दाते हे होते. त्यांनी आम्हा प्रत्येक सहकलाकाराला त्यांच्या समान दर्जाने वागवलं. कुठेही जायचे असू आम्ही सर्वच जण एकत्र जायचो, मी मोठा कलाकार आहे, मी आधी जाणार, वेगळा जाणार हे त्यांच्या ठायी नव्हते. ते खाण्याचे शौकीन होते आणि प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेण्याची त्यांची वृत्ती होती.

यानंतर स्व. अरुण दाते यांच्या अजरामर मराठी गीतांचा ‘शुक्रतारा’ हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सुप्रसिद्ध गायक सारंग पडळकर, श्रीरंग भावे, सुप्रसिद्ध गायिका पल्लवी पारगांवकर, वर्षा जोशी व अंजली मराठे यांनी गीते प्रस्तुत केली. तर प्रसन्न बाम, अमित कुंटे, अभय इंगळे व केदार परांजपे यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन हे सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुश्री फडणीस यांनी केले तर स्वतः अतुल अरुण दाते यांनी उपस्थितांशी संवाद साधत अरुण दाते यांच्या आठवणींना उजाळा दिला.  सायली सोनटक्के यांनी स्क्रीन व्यवस्था, तर प्रशांत (Pune) कांबळे यांनी ध्वनी व्यवस्था पाहिली. ऋचा थत्ते यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.