Pune : पुण्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का..पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार

एमपीसी न्यूज- पुण्यात उद्धव ठाकरे गटाला (Pune) मोठा धक्का बसला आहे.ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी मुंबईत  त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेब चांदेरे यांच्यासह अनेकजण शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यापूर्वी रमेश कोंडे यांनी ठाकरे गटाची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता चांदेरे हे देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्यानं हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Charholi News : मजबूत दातांना वेळीच घ्या विम्याचे ‘कवच’

या  सर्व प्रकारानंतर  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यालयातून पत्र काढण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे (Pune) देण्यात आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.