Pune BJP : कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजप ॲक्शन मोडवर; शहराध्यक्ष बदलण्याची चिन्हे

एमपीसी न्यूज : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभव (Pune BJP) भारतीय जनता पक्षाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. तब्बल 28 वर्षापासून अभेद्य असणारा हा गड महाविकास आघाडीने अखेर आपला ताब्यात घेतला आहे. त्यानंतर आता भाजपही ॲक्शन मोडवर आली आहे. या पराभवानंतर पुणे शहर भाजप कार्यकारिणीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या महिना अखेरीस मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. पुणे शहर भाजपाध्यक्ष बदलण्याची ही शक्यता आहे. पुणे शहर भाजप अध्यक्ष पदासाठी माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे आणि गणेश बिडकर यांच्या नावाची चर्चा आहे.

भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीनंतर भाजपचा अभेद्य गड असलेला कसबा भाविकास आघाडीने हिसकावून घेतला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. त्यामुळे पुणे शहर भाजप पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. भाजपचे शहराध्यक्ष बदलणार असल्याच्या चर्चांना उधाण आले.

Pune : महिला दिनालाच दोन महिलांनी संपवलं आयुष्य; पुणे जिल्ह्यातील घटनेने खळबळ

त्यानंतर आता पुणे शहर पक्ष नेतृत्वात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भाजपचे (Pune BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील बदल होण्याचे सुतोवाच वर्तवले आहेत. त्यामुळे आता पुणे शहर भाजप अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.