Pune : महिला दिनालाच दोन महिलांनी संपवलं आयुष्य; पुणे जिल्ह्यातील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज : संपूर्ण जगात महिला दिन उत्साहात (Pune) साजरा होत असतानाच पुण्यातील दौंड तालुक्यातून मात्र या दिनाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. दोन महिलांनी याच दिवशी आयुष्याची अखेर करत आपली जीवन यात्रा संपवली आहे. दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात ही घटना घडली.

यमुना हनुमंत कारंडे आणि पूनम बाळासो टेकवडे अशी आत्महत्या करणाऱ्या या दोन महिलांची नावे आहेत. दौंड तालुक्यातील वेगवेगळ्या गावात या घटना घडल्या. या दोन महिन्यांनी अशा प्रकारे आयुष्याची अखेर केल्याने गावावर शोककळा पसरली आहे. मात्र या महिलांनी अशा प्रकारे आत्महत्या का केली हे अद्याप समोर आले नाही.

पारगाव येथे राहणाऱ्या यमुना कारंडे यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तर कासुर्डी गावात राहणारी 22 वर्षे तरुणी पुनम हिने राहत्या घरात आत्महत्या केली आहे. घरातील लोखंडी पत्राला साडीच्या साहाय्याने तिने गळफास घेतला.

महिला दिनाच्या दिवशीच अशा प्रकारची घटना घडल्याने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या दोघींनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा (Pune) आता तपास करत आहेत.

Talegaon News : तळेगाव शहरामध्ये ‘बंद’ला नागरिकांचा प्रतिसाद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.