Pune : उधारीवर खरेदी केलेल्या मालाची रक्कम परत न करता दुकानदाराची अडीच कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – उधारीवर तब्बल अडीच कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करून रकमेची परतफेड न करणाऱ्या चार जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार

_MPC_DIR_MPU_II

या प्रकरणी सुरेश जेठवाणी यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी प्रल्हाद लक्ष्मण हरियाणी, सुनील श्रीचंद हरियाणी, अनिल श्रीचंद हरियाणी व एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश जेठवाणी यांचे बुधवार पेठेमध्ये इंडियन केबल्स अॅन्ड इलेक्ट्रीकल्स नावाचे दुकान आहे. सहा महिन्यापूर्वी प्रल्हाद लक्ष्मण हरियाणी आणि अन्य तिघांनी मिळून लॉर्ड इलेक्ट्रीकल्स या फर्मच्या नावाने 1 कोटी 53 लाख 4 हजार 392 रूपये किंमतीच्या वस्तू व जे.पी.इलेक्ट्रीकल्स या फर्मच्या नावाने 93 लाख 83 हजार 305 रूपये किमतीच्या वस्तू असा एकूण 2 कोटी 46 लाख 87 हजार 697 रूपये किंमतीचा माल उधारीवर खरेदी केला. मात्र वारंवार मागणी करून देखील पैसे परत केले नाहीत. त्यावरून चौघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपस फरासखाना पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1