Pune News : कोयत्याने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना अटक

एमपीसी न्यूज : कोयत्याने मारहाण करून जिवे मारण्याचा (Pune News) प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत केदार कुंभार ग्राहक कसबा पेठ पुणे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पवन जाधव, वय 21 वर्षे रा. कसबा पेठ पुणे, आयान शेख, वय 19 वर्षे रा. कसबा पेठ पुणे, आदित्य भुजबळ वय 22 वर्षे रा कसबा पेठ, पुणे या तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे.

31 डिसेंबर 2022 रोजी फिर्यादी व त्यांचा मित्र यश पिंगळे हे अगरवाल सोसायटी कसबा पेठ पुणे येथे गेटच्या आतील बाजूस आपापल्या मोबाईल फोनवर पबजी गेम खेळत बसलेले होते. त्यावेळेस त्या ठिकाणी आरोपी आदित्य भुजबळ, पवन जाधव व आयान शेख हे फिर्यादी केदार कुंभार यांच्याजवळ आले व त्याच्याशी विनाकारण भांडण काढून तू रोहितचा मित्र आहेस ना, तुला खल्लासच करतो असे बोलून कोयता फेकून मारला. तसेच त्याला डोक्यावर, मानेवर, खांद्यावर मारून जखमी केले.

Pune News : जी- 20 परिषदेच्या अनुषंगाने पुणे शहरात ड्रोन कॅमेरा छायाचित्रण करण्यास पोलिसांची मनाई

त्याचवेळी तेथे रोहित दरेकर हा आला असता त्याने आरोपी आदित्य भुजबळ याला कोयता उचलून पॅन्टच्या आत टाकताना पाहिले असता तो त्याच्याकडे जाऊन केदारला मारू नको असे बोलला. आरोपी अदित्य भुजबळ यांनी आज तुझाच मर्डर करतो असे म्हणून त्याच्या पॅन्टमध्ये ठेवलेला कोयता जोरात (Pune News) फिरवून रोहित दरेकर यांच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले आहे. तसेच आरोपी पवन जाधव व आयान शेख यांनी शिवीगाळ करून धमकी दिली म्हणून फरासखाना पोलीस ठाण्यात भादवि कलम 307, 504, 506, 34, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) सह 135 आर्मी कलम 4, 25 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या तिन्ही आरोपींचा शोध सुरू असताना पोलीस हवालदार तुषार खडके यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे शोध घेत आरोपींना तात्काळ अटक करण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.