Somatane Toll : सोमाटणे टोलनाक्यावरील रोजच्या वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त

एमपीसी न्यूज- जुना पुणे-मुंबई महामार्गावर असलेला सोमाटणे टोलनाका वाहतूक कोंडीच्या समस्येचे मुख्य कारण बनला आहे. (Somatane Toll) नवं वर्षाच्या पूर्वसंध्येला दि. 31 डिसेंबर रोजी तर वाहतूक कोंडीने परिसीमाच गाठली . टोलनाका ते तळेगाव लिंब फाटा व टोलनाका ते देहूरोड बायपास पर्यंत वाहनांच्या लांबच लांब विक्रमी रांगा दिसल्या. दररोजच्या या वाहतूक कोंडीने मात्र सर्वसामान्य पुरते मेटाकुटीला आलेले पाहायला मिळाले.

दरम्यान सोमाटणे टोलनाका आणि वाद हे जणू समीकरणच बनले आहे .कारण सर्वपक्षीय नेत्यांनी काही महिन्यांपूर्वी काढलेला मोर्चा व त्या नंतर त्याला मिळालेले राजकीय वळण या मुळे हा प्रश्न अधांतरीच राहिला गेला . टोलनाका अधिकृत कि अनधिकृत या बाबतही सर्वसामान्य अद्याप अनभिन्न आहेत . तसे काही असले तरी मात्र काल झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीने पुन्हा टोलनाक्याबाबतच्या व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

रोजच्या वाहतूक कोंडीने सर्वसामान्य तर ग्रस्त झालेच आहेत परंतु बहुतांश वेळा रुग्णवाहिका यामध्ये अडकून रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. (Somatane Toll) टोलनाका व्यवस्थापन हे मावळातील स्थानिक वाहनचालकांकडून देखील सक्तीने टोल वसूल करताना आढळत आहे. या प्रकरणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे,  असे मत माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी व्यक्त केले.

Pimpri News : चुकीला माफी नाही; ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत 139 जणांवर पिंपरी-चिंचवडमध्ये कारवाई

धक्दाकायक बाब म्हणजे टोलनाका येथे काम करत असलेले कर्मचारी स्थानिकांना अरेरावीची भाषा व उद्धटपणे वर्तन करत असल्याचे निदर्शनास आले आहे. सोमाटणे फाटा टोलनाका व्यवस्थापनाने किमान वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाक्याचा आदर्श घ्यावा ,असा सल्लाही प्रदीप नाईक यांनी दिला आहे.

मावळ तालुक्यातील नागरिकांना वाहतूक समस्येच्या गर्तेतून सुटका  कधी मिळेल, टोलमुक्ती कधी मिळेल, असे प्रश्न  स्थानिक प्रशासनाला विचारत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.