Pimpri News : सेप्टिक टँक स्वच्छतेचे काम करणाऱ्या ठेकेदारांना नोंदणी बंधनकारक

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सेप्टिक टँक स्वच्छतेचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी काम सुरू करण्यापूर्वी, त्यांच्या कामाच्या स्वरूपाच्या आधारे पालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. पालिकेच्या हद्दीत अनौपचारिकरित्या काम करताना, (Pimpri News) असुरक्षितरित्या काम करताना किंवा मैला उघड्यावर उत्सर्जित करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

स्वच्छ भारत/महाराष्ट्र अभियान (नागरी) कार्यक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण 2023 ची अंमलबजावणी सुरु आहे. त्याअनुषंगाने शहरास WATER PLUS प्रमाणिकरण प्राप्त व्हावे यासाठी महापालिका तयारी करत आहे. त्यासाठी महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सेप्टिक टँक स्वच्छतेचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी काम सुरू करण्यापूर्वी, त्यांच्या कामाच्या स्वरूपाच्या आधारे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या हद्दीत अनौपचारिकरित्या काम करताना, असुरक्षितरित्या काम करताना किंवा मैला उघड्यावर उत्सर्जित करताना आढळल्यास कायदेशीर(Pimpri News) कारवाई केली जाईल.

Chinchwad News : अजित पवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजपाचे निषेध आंदोलन

मलकुंड टाकीच्या क्षमतेनुसार, त्यात साचलेला मैला 3 वर्षांच्या नियमित कालावधीत महापालिकेने मान्यता दिलेल्या प्रतिनिधी संस्था / ठेकेदारांकडूनच उपसणी केली पाहिजे. किंवा महापालिकेची मदत घेऊन विशिष्ट शुल्क भरून मैला उपसा करून घेणे अनिवार्य आहे. याकरीता  निवासी इमारतीसाठी प्रति खेप 1 हजार 500 रुपये आणि व्यावसायिक इमारतीसाठी प्रति खेप 2 हजार 500 रुपये  इतके सेवाशुल्क (Pimpri News) आकारण्यात येणार आहे.

महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील खासगी मलकुंड टाक्या (सेप्टिक टँक) उपसणे/स्वच्छतेसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या वाहनांचा (सुलेज व्हॅनचा) वापर करता करावयाच्या झाल्यास पालिकेच्या  https://www.pcmcindia.gov.in/ > RESIDENTS> Citizens Facilitation Centre> CFC online application> Download forms> आरोग्य विभाग> सेप्टिक टँक उपसणे  येथे नागरिकांनी अर्ज बनवून वरीलप्रमाणे  शुल्क भरावे व  जवळच्या नागरी सुविधा केंद्रात (Citizens Facilitation Centers) जाऊन अर्ज करावा आणि शहराच्या  घनकचरा व्यवस्थापनास सहकार्य करावे.

तसेच मलमूत्र /सांडपाणी /मलकुंड स्वच्छ केल्यावर गोळा केलेला मलगाळ यांचा उत्सर्ग खासगी गटारे/ मलवाहिनी याद्वारे पावसाळी पाण्याच्या वाहिन्या, रस्ता, मोकळ्या जागा, जलसाठे, (Pimpri News) जलमार्ग, शेतजमीन अथवा अन्य अवांच्छित ठिकाणी उत्सर्जित केल्यास घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा सहाय्यक आयुक्त विनोद जळक  यांनी दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.