Alandi News : महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त आळंदीमध्ये पोलिसांचा सन्मान

एमपीसी न्यूज – दिनांक 2 जानेवारी 1961 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता. (Alandi News) त्यामुळे 2 जानेवारी हा दिवस पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो.त्या पार्शवभूमीवर दि.2 जानेवारी रोजी आळंदी पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी वर्गाचा सन्मान करण्यात आला.

पोलीस वर्धापन दिनाच्या पार्शवभूमीवर आळंदी पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक रमेश पाटील,पोलीस उपनिरीक्षक बाप्पूसाहेब जोंधळे, पोलीस उपनिरीक्षक विद्या माने, पोलीस हवालदार मच्छिंद्र शेंडे,सहाय्यक पोलीस हवालदार दत्तात्रय टोके तसेच आळंदी पोलीस कर्मचारी वर्गाचा सन्मान करण्यात आला.

Pimpri News : सेप्टिक टँक स्वच्छतेचे काम करणाऱ्या ठेकेदारांना नोंदणी बंधनकारक

या प्रसंगी माजी नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, कोयाळी गावचे मा. सरपंच बाप्पूसाहेब सरवदे उपस्थित होते. याबाबत माहिती माजी नगरसेवक सचिन गिलबिले यांनी दिली. (Alandi News) तसेच सोशल मीडिया च्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त अनेक नागरिकांनी पोलिसांना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.