Talegaon Dabhade : रसिकांच्या उदंड प्रतिसादात कलापिनी व कृष्णराव भेगडे प्रतिष्ठानचा ‘रौप्य महोत्सवी वर्षांत महोत्सव’ संपन्न

एमपीसी न्यूज : कला संस्कृतीच्या संगमावर, सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कलापिनी सांस्कृतिक केंद्रात जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य दिमाखदार वर्षांत महोत्सव संपन्न झाला. कलापिनी आणि मा. आ. कृष्णराव भेगडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने (Talegaon Dabhade) वर्षांत महोत्सवाचे आयोजन केले होते. महोत्सवाचे हे 25 वे वर्ष होते. पुणे, पिंपरी-चिंचवड, निगडी, वडगाव, इंदोरी, तळेगाव येथील 300 पेक्षा जास्त कलाकार कार्यक्रमात सहभागी झाले होते. अगदी 4 वर्षांच्या बालकांपासून 80 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत कलाकारांचा सहभाग होता.

यावेळी बांधकाम व्यवसायिक संदीप सोनिगरा, उद्योजक राजेश म्हस्के, कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, विश्वस्त डॉ. अनंत परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस माजी आमदार कै.दिगंबर भेगडे व तळेगावचे माजी नगराध्यक्ष कै.सुरेशभाई शहा यांना आदरांजली वाहण्यात आली

कार्यक्रमात ज्येष्ठ रंगकर्मी अभय लिमये, किनारा वृद्धाश्रमाच्या प्रीती वैद्य, सिने नाट्य अभिनेता अंबरीश देशपांडे यांना वर्षांत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नृत्य अभ्यासक मंगेश साळुंखे आणि सिने संकलक अक्षय साळवे यांना वर्षांत सितारा या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.(Talegaon Dabhade)‘आमच्या जडण घडणीत कलापिनीचा खूप मोठा वाटा आहे, कलापिनीच्या संस्कारांचा आम्हाला अभिमान वाटतो’ असे मनोगत सिने नाट्य कलाकार अंबरीश देशपांडे आणि अक्षय साळवे यांनी व्यक्त केले. ‘कलापिनीने गौरव केल्याबद्दल खुप छान वाटले’ असे कलापिनीचे जेष्ठ रंगकर्मी अभय लिमये यांनी आपल्या मनोगतात सांगितले. किनारा वृद्धाश्रम कामशेत च्या संचालिका प्रीती वैद्य यांनी त्यांच्या निराधार वृद्धांना आधार देण्याच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल कलापिनीचे आभार मानले.

Alandi News : महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त आळंदीमध्ये पोलिसांचा सन्मान

दिगंबर कुलकर्णी यांच्या भक्तिगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अंकित क्रिएशनच्या कलाकारांनी नृत्य सादर केले. नटराज डान्स स्टुडीओने अप्रतिम नृत्य सादर केले. उद्योगधामच्या मुलांनी आणि कलापिनी कुमारभवनच्या नृत्याने रसिकांची मने जिंकली.  वानप्रस्थाश्रम, मंगेश डान्स अकादमी, दापोडी येथील आर. के. डान्स स्टुडीओ, सायली डान्स स्टुडीओ यांच्या वतीने बहारदार नृत्य सदर करण्यात आली. आदर्श विद्या मंदिर, संचय कथक डान्स अकादमी, टीम डान्स मेनिया यांच्या नृत्यांनी बहार आणली.

देहू कलामंचाच्या मुलीनी केलेला मुजरा रसिक प्रेक्षकांना प्रचंड आवडला. कलापिनी महिला मंच आणि बालभवन यांची नृत्ये रसिकांनी डोक्यावर घेतली. टीम डान्स मेनियाच्या  नृत्याने वन्स मोअर मिळवला. तालतरंग संगीतालयाच्या वतीने बासरी वादन, माउथ ऑर्गन वादन, गायन सादर करण्यात आले. (Talegaon Dabhhade) संदीप शिंदे यांच्या मल्लखांब आणि योगासनांच्या चित्तथरारक सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये 50 बाल युवा कलाकारांचा सहभाग होता. स्टेप हार्ड डान्स अकादमीचे फ्युजन नृत्य, मंगेश साळुंखे, इंद्रायणी स्कूल, मावळ स्टार कलाविष्कार यांच्या सादरीकरणाने रसिकांची वाहवा मिळवली.

विजय कुलकर्णी, अविनाश शिंदे आणि विद्या अडसुळे यांनी रंगतदार सूत्रसंचालन केले. सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. विनया केसकर यांनी केले. अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी स्वागत केले.डॉ अनंत परांजपे यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांनी आभार मानले. अनघा बुरसे, माधवी एरंडे, रश्मी पांढरे, दीपाली जोशी, दीप्ती आठवले, हरीश पाटील, वेदांग महाजन, प्रीती शिंदे, नमन शिरोळकर,ऋषिकेश कठाडे,यश गव्हाणे, दिपांशू सिंग आदींनी कार्क्रामाचे उत्तम व्यवस्थापन केले. शार्दूल गद्रे, स्वच्छंद, विनायक भालेराव, अशोक बकरे, रामचंद्र रानडे, विपुल परदेशी यांनी संयोजन केले. सुमेर नंदेश्वर यांनी ध्वनी संयोजन केले.

विविध कलांच्या सादरीकरणाने सरत्या वर्षाला निरोप देण्याची रौप्य महोत्सव साजरा करणारी ‘वर्षांत’ उत्सवाची कलापिनीची संकल्पना रसिकांना खूपच भावली आहे हे त्यांनी कार्यक्रमाला केलेल्या प्रचंड गर्दीमुळे दिसून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.