BNR-HDR-TOP-Mobile

Pune : ‘पुणेकरांनो पाणी जपून वापरा !’ कृष्णा खोरे महामंडळाची सूचना

एमपीएस न्यूज- पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता. 15 जुलै पर्यंत पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने पुणेकरांना आता काटकसरीने पाणी वापरावे लागणार आहे. पुणे शहराच्या पाणी नियोजनाबाबत सिंचन भवनातील कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यालयात आज बैठक झाली. या बैठकीत कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक खलील अन्सारी यांनी ही माहिती दिली.

या बैठकीनंतर खलील अन्सारी म्हणाले की, सद्यस्थितीला पुणे शहराला दररोज 1350 एमएलडी पाणीपुरवठा केला जात असून जलसंपत्ती प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार 960 एमएलडी पाणी पुणे शहराला देणे गरजेचे आहे. या बाबत कालवा समितीच्या बैठकीत किंवा पालकमंत्री गिरीश बापट यांनी निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3